CERA CRYSTALLINE INTEGRAL सुचविण्यात आलेल्या डिजाइन मिक्स पद्धतीने अथवा नेहमीच्या पद्धतीने कॉँक्रिट करावे, पाण्याचे प्रमाण न वाढवता CERA अॅडमिक्सर / प्लास्टीसायझर वापरुन स्लम्प १५० ते १८० च्या दरम्यान आणावा. सेरा क्रिस्टलाइन इनटिग्रल पाण्यामध्ये मिक्स करावे.(४०० ते ५०० gms + १००० एमएल पाणी प्रती सिमेंट पोते) सदरचे मिक्स केलेले सेरा क्रिस्टलाइन इनटिग्रल मिक्सर ची हंडीमध्ये किंवा ट्रांजीट मिक्सरमधिल तयार कॉँक्रिटमध्ये मिक्स करावे व कॉँक्रिट मिक्सरची हंडी पुन्हा हाय स्पीडला कॉँक्रिट आणि सेरा क्रिस्टलाइन इनटिग्रल पूर्णपणे मिक्स होईपर्यंत (अंदाजे ३ मिनिटे हंडी मिक्सर साठी आणि ५ ते १० मिनिटे टिएमसाठी फिरवून घ्यावी) (सेरा क्रिस्टलाइन इनटिग्रल कॉँक्रिटमध्ये मिक्स केल्यावर माल घट्ट होईल पण पुन्हा मिक्सर हंडी फिरवल्यानंतर पुर्व स्थितीला येईल म्हणजेच स्लम्प १५० ते १८० च्या दरम्यान येईल त्यानंतर कॉँक्रिटिंग काम करावे, ***नुसती कोरडी सेरा क्रिस्टलाइन इनटिग्रल पावडर ओल्या कॉँक्रिटमध्ये मिक्स करू नये ***