Bootstrap Themes

A-103a-CERA LASTIC (24 KG)

ELASTOMERIC CEMENTITIOUS WATERPROOF COATING FOR SUNK & BATTERED SLABS. संकन पोर्शन वॉटरप्रुफ कोटींग (संपूर्ण पद्धत) 1. प्रथम सर्व संक एरिया टाच्या मारून व त्यानंतर पाण्याने(गरज वाटल्यास अॅसिडने) स्वच्छ करून घ्यावा. 2. त्यानंतर त्यावर CERA LATEX SBR-PRO+पाणी १:१प्रमाणात घेऊन त्याचा प्रायमर कोट द्यावा. 3. त्यानंतर प्रायमर कोटमुळे दिसायला सुरवात झालेले क्रॅक CERA ACRYSEAL ने अथवा CERA CRACKFILL POWDER भरून घ्यावेत क्रॅकच्या जाडीप्रमाणे आवश्यक असल्यास त्यावर BUTYAL TAPE/नॉन वोव्हन फॅब्रिक लावावे. 4. त्यानंतर संकचे कॅार्नर सिमेंट+CERA LATEEX-PRO+खडीच्या मालाने champering करून घ्यावे व सर्व सरफेस पाण्याने ओलसर करून घ्यावा.(अतिरिक्त साठलेले पाणी पुसून घ्यावे.) 5. त्यानंतर त्या ओलसर सरफेसवर CERALASTIC, पाणी किंवा इतर काहीही जादा मटेरियल न वापरता व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि फायनल कोट द्यावा. (coverage 5.5 to 6 sqft./kg/2coats) 6. वरील प्रमाणे कोटींग करण्यापूर्वी प्लंबरकडून संकमध्ये लिकेज पाइप तसेच न्हाणीट्रॅप व संडास भांडे ला जोडणारी पाइप भिंतीला होल पाडून फिट करणे आवश्यक आहे. तथापी सदरप्रमाणे प्लंबरचे काम होण्यापूर्वी कोटींग करायचे असल्यास, नंतर केलेल्या पाइप फिटिंगचे जॉइंटस सर्व बाजूने सिमेंट +CERA LATEEX-PRO ने व्यवस्थित भरून त्यावर CERA CERALASTIC चे कोटींग करून घ्यावे. 7. त्यानंतर लिकेज पाइप कडे स्लॅबवरील पाण्याचा स्लोप देऊन ब्रिक बॅट कोबा व साइड वॉल गिलावा करून घ्यावा. 8. त्यावर गरजेप्रमाणे बॅक फिलिंग करून त्यावर ग्रीट कोबा करावा.व त्यावर CERA BOND 26 टाइलमॉर्टर वापरून फरशी बसवावी. आणि फरशी बसवताना २ ते ३ एम एम चे ग्रुव्ह सोडून त्यामध्ये CERA EPOXY GROUT भरून घ्यावे.

...
...
...